शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

काल सेनेत, आज राष्ट्रवादीत प्रवेश - धामापूर सरपंचांचा पराक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 16:48 IST

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागताच सत्तेच्या दाव्याचे खेळ सुरु झाले आहेत. बुधवारी धामापूर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला.

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या सोशल मिडिया सेलवरुन याचे फोटो सोशल मिडियावमतदारांनी आपले काम केले की विजयी झाल्यावर मतदारांना गृहीत धरून पक्षीय प्रताप सुरु होतात

देवरुख : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागताच सत्तेच्या दाव्याचे खेळ सुरु झाले आहेत. बुधवारी धामापूर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. निसटत्या मतांनी विजयी झालेल्या महिला सरपंचांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला आज त्याच सरपंचांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सत्ता मिळाल्यावर मतदारांना गृहीत धरून झालेल्या या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

फेब्रुवारी २०१९मध्ये मुदत संपणाºया धामापूर तर्फे देवरुख ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक बुधवारी पार पडली. यावेळी थेट सरपंच पद असल्याने चार उमेदवारांमधे चुरस होती. सरपंचपदासाठी गौरी गुरव आणि सुहासिनी भातडे यांच्यात जोरदार लढत झाली यात भातडे ११ मतांनी विजयी झाल्या. 

यातील भातडे यांनी गावविकास पॅनेलच्या माध्यमातून तर गुरव यांनी स्वबळावर निवडणूक लढवली. निकाल जाहीर होताच भातडे व सदस्य अमित जाधव यांनी जिल्हा परिषद सदस्य रोहन सुभाष बने यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी बुधवारी गावातून त्यांची मिरवणूक काढली. 

शिवसेनेत प्रवेश करून २४ तास होतात न होतात तोच भातडे आणि जाधव यांनी गुरुवारी सावर्डे येथे शेखर निकम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या सोशल मिडिया सेलवरुन याचे फोटो सोशल मिडियावर येताच याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.ग्रामपंचायत निवडणूकीत पक्षीय चिन्ह नसते त्यामुळे मतदारांना भुलवण्यासाठी गाव पॅनेल, गाव आघाडी, गाव विकास पॅनेल अशा गोंडस नावांचा वापर होतो मात्र मतदारांनी आपले काम केले की विजयी झाल्यावर मतदारांना गृहीत धरून पक्षीय प्रताप सुरु होतात.